मायणीत स्कूल बसमधून दीड लाखाची रोकड जप्त

मायणी – सध्या लोकसभेच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र पोलीस विभागामार्फत चेक नाके उभारण्यात आले आहेत. मायणी, ता. खटाव येथील चेक नाक्‍यावर एस.एस.टी पथकाने आज पहाटे दीडच्या सुमारास सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या स्कूल बस (एन. एच.10 ए डब्ल्यू 5044) या वाहनातून एक लाख पन्नास हजार रुपयांची रोकड जप्त करण्याची कारवाई केली.

आष्टा, ता. वाळवा येथील अण्णासाहेब डांगे मेडिकल कॉलेजचे कर्मचारी स्कूल बसमधून चौंडी या ठिकाणी जात होते. मायणी येथील चेक नाक्‍यावर या वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांना रोकड आढळून आली. मेडिकल कॉलेजची दुसरी शाखा चौंडी या ठिकाणी असून तेथील कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी ही रक्कम देण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. एस.एस. टी. पथकप्रमुख आर. आर. भोसले, नितेश काळे, गणेश कुंभार या पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.