तर टॅंकरचे भाडे होणार कपात

प्रांताधिकारी, तहसीलदार व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी

नगर: दुष्काळी भागात पाणी व पशुधनासाठी चारा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाप्रशासनाकडून 504 चारा छावण्या व 847 टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. चारा छावण्यामध्ये जनावरांना नियमित चारा मिळतोका व टॅंकर सुरू असलेल्या गावात त्याच्या ठरवून दिलेल्या खेपा होत आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील चारा छावण्यांना व टॅंकर सुरू असलेल्या गावांना भेटी देण्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदारांची पथके तयार करून अचानक तपासनी करण्यात येत आहे. टॅंकरमध्ये अनियमितता आढळल्यास त्या दिवसाचे भाडे कपात करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी सांगितले.

दुष्काळी भागात पाणी व जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 504 चारा छावण्या सुरू आहेत. व 847 टॅंकर सुरू करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने गावातील टॅंकर जीपीएस, लोंकबुक, व जनावरांसाठी सर्व चारा छावणी अचानक तपासणीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी 21 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये 7 प्रांताधिकारी व 14 तहसीलदारांचा समावेश असून जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी यांचा ही समावेश करण्यात आला आहे.

ज्या गावांमध्ये टॅंकरने पाणी पुरवठा केला जातो त्या गावामध्ये विहिर/ बोरअवेलाधिग्रहन शक्‍य आहे किंवा नाही. गावांच्या 1.5 किलोमिटर परिसरात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे की नाही. गावात पाणी पुरवठा योजना आहे किंवा नाही. असे असल्यास या स्त्रोतांची सध्या परिस्थिती काय आहे. टॅंकर जवळच्या उदभवावरून भरले जातात की नाही. याची खात्री करणे. गावाची लोकसंख्या त्यानुसार उपलब्ध पाणी यानुसार टॅंकरद्वारे मागील केलेल्या खेपा योग्य आहेत की नाही. मजूर टॅंकर व मंजूर खेपा प्रमाणे दररोज पाणी पुरवठा होतो किंवा नाही. तसेच याबाबत पाणीपुरवठा समितीचे नियंत्रन आहे काय. तसेच महिला समितीच्या दोन किंवा तीन सदस्यांच्या सह्या आहेत का. टॅंकर तपासणीत जी.पी. एस कार्यंन्वित आहे काय. त्याचा अहवाल रोजच्या रोज घेतला जातो का? शासन निर्णयानुसार अवैध पाणी उपशांच्या किती प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे याबाबत अहवाल सादर करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.