रेडा – केंद्रातील भाजपचे सरकार सातत्याने पेट्रोल व डिझेल दरवाढ करीत आहे. एक तर करोनाने जनता सैरभैर झाली आहे. त्यातच पेट्रोल, डिझेलची दरवाढ थांबत नाही. यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. जर केंद्राने दरवाढ कमी केली नाही तर इंदापूर तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करू, असा इशारा इंदापूर तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
केंद्र सरकार गेले वीस दिवस झाले पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ करत आहे. त्यामुळे सर्व सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाची आहे. याबाबत तहसील कार्यालयात पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी काकासाहेब देवकर, जकिर काझी, बिभिषण लोखंडे, चमनभाई बागवान, भगवान पासगे, निवास शेळके, तुषार चिंचकर, संतोष शेंडे, सुरेश लोखंडे व दत्तु देवकर उपस्थित होते.