मुंबई – अभिनेता हृतिक रोशनच्या “मोहेंजोदडो’ चित्रपटातून धमाकेदार सुरुवात करणारी अभिनेत्री ‘पूजा हेगडे’ सतत कोणत्या-न-कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. पुजा लवकरच सलमान खानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 21 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून, चित्रपटात शहनाज गिल, राघव जुआल आणि पलक तिवारी देखील दिसणार आहेत.
दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अभिनेत्री पूजा हेगडे चांगलीच चर्चेत आली आहे. त्याच कारण देखील तितकंच खास आहे. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर स्वतःचे काही नवीन फोटो शेअर केले असून, सध्या तिचे हे फोटो सगळीकडे धुमाकूळ घालताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर देखील पूजाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी पूजा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. खुद्द पूजाने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.
शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड अँड ग्लॅमर्स अंदाज पाहायला मिळत आहे. यावेळी पूजाने लाल रंगाच्या स्लीट ड्रेसमधील काही फोटोज शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनदेखील अगदी हटके दिलं आहे. तिने लिहिलं की, “काडेपेटीतील काडी कुठे आहे, कारण लवकरच मी आग लावणार आहे.”
पूजाच्या या बोल्ड आणि हॉट फोटोजनी सोशल मीडियावर एकाअर्थी खरंच आग लावलेली आहे. या ड्रेसमधील पूजाचा हा बोल्ड आणि मादक अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. या फोटोवर चाहत्यांनी कॉमेंट करत पूजाच्या या हॉटनेसची प्रशंसा केली आहे. इतकंच नाही तर तिच्याएवढी बोल्ड आणि हॉट अभिनेत्री सध्या कुणीच नाही असंही तिचे चाहते म्हणताना दिसत आहेत.