नवी दिल्ली – पोर्तुगालमध्ये काम करण्यासाठी भारतीय नागरिकांची भर्ती करण्याबाबतच्या भारत आणि पोर्तुगाल दरम्यानच्या करारावर स्वाक्षरी करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. हा करार भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील भागीदारी आणि सहकार्याच्या दृष्टीने, पोर्तुगालमध्ये भारतीय कामगार कामासाठी पाठवणे आणि पोर्तुगालने ते स्वीकारणे यासाठी एक संस्थात्मक यंत्रणा निर्माण करेल.
विशेषत: कोविड -19 च्या साथीनंतर अनेक भारतीय कामगार भारतात परतल्याच्या पार्श्वभूमीवर, पोर्तुगालसोबतच्या या कराराने भारतीय स्थलांतरित कामगारांना पोर्तुगालमध्ये नवीन कामाचे ठिकाण जोडले जाईल. भारतातील कुशल भारतीय कामगार आणि व्यावसायिकांसाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहे.
तसेच पोर्तुगालमध्ये काम करण्यासाठी भारतीय कामगारांना नोकरीच्या संधी वाढणार आहेत. या करारामध्ये प्रस्तावित सरकार-ते-सरकार यंत्रणा दोन्ही बाजूंच्या जास्तीत जास्त पाठिंब्यामुळे कामगारांची सुरळीत वाहतुक केली जाणार आहे.