पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात गुरूवारी (दि. 30) 111 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज शहरात 111 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 73 हजार 856 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात मागील एका बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत आणखी एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 4437 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 77 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 69 हजार 323 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 5101 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. सद्यस्थितीत रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 400 तर गृह विलगीकरणात 427 असे एकूण 827 रुग्ण उपचार घेत आहेत.