केडगावातील शेतकऱ्यांना दिलासा

केडगाव – पाटबंधारे विभागाच्या वतीने येथील फाटा क्रमांक 23 ला आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पावसाळ्यात या भागात मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे विहिरी आणि कूपनलिका यांच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. अशा स्थितीत कालव्याच्या पाण्याची नितांत आवश्‍यकता होती. पाटबंधारे विभागाने याची दखल घेऊन फाटा क्रमांक तेवीससाठी आवर्तन सोडले आहे. या पाण्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आवर्तनाच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी नवीन ऊस लावण्यास सुरुवात केली आहे, परंतु कालव्याचे पुढील आवर्तन लांबल्यास त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. यासाठी पाटबंधारे विभागाने पुढील आवर्तन लांबणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.