आमच्याकडे विकासाचे डॅशिंग रसायन आहे त्यामुळे भाजपमध्ये मेगाभरती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुप्रिया सुळे यांना उत्तर

नवी दिल्ली : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर नेत्यांच्या पक्षांतराचा सिलसिला जोरात सुरू आहे. त्यावरून सर्व पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याच पार्श्‍वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली होती. त्याच टीकेला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आमच्याकडे विकासाचे डॅशिंग रसायन आहे त्यामुळे विरोधी पक्षातील नेते आमच्या पक्षात येत असल्याचे सांगत सुप्रिया सुळे यांना उत्तर दिले आहे.

कॉंग्रेस आणि राष्अ्रवादीच्या बड्या नेत्यांनी भाजपची वाट धरली त्यावर एकेकाळी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असणारे भाजपमध्ये गेले त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपकडे कोणती वॉशिंग पावडर आहे ज्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप धुतले जात असल्याचा मार्मिक सवाल केला होता. त्यालाच मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. आम्ही कुठलीही वॉशिंग पावडर वापरत नाही. आमच्याकडे विकासाचं डॅशिंग रसायन आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच अनेक पक्षांचे लोक आमच्याकडे येत आहेत. विरोधी पक्षांवर जनतेचा सोडा, त्यांच्या लोकांचाच विश्वास राहिलेला नाही’, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. भाजपामधील मेगाभरतीची काळजी करण्याऐवजी स्वत:च्या पक्षातील मेगागळतीची चिंता करावी, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×