माद्रिद : ला लीगा फुटबाॅल स्पर्धेमध्ये झालेल्या सामन्यात रियल माद्रिद संघाने पिछाडीनंतर पुनरागमन करत सेल्टा विगो संघाला २-२ ने बरोबरीत रोखले. या बरोबरीनंतरही रियल माद्रिदचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी कायम आहे.
Substitute @SantiMina7 strikes late on to earn a point for @RCCeltaEN at the Bernabeu. 💙💥#RealMadridCelta 2-2 pic.twitter.com/zm0rrDSKCT
— LALIGA English (@LaLigaEN) February 16, 2020
सेल्टा विगो संघाकडून फेडोर स्मोलोव याने ७ व्या मिनिटाला गोल करत संघास १-० ने आघाडीवर नेले. पण, त्यानंतर रियल माद्रिद संघाच्या टोनी क्रूजने ५२ व्या मिनिटाला आणि सर्जियो रोमास याने ६५ व्या मिनिटाला गोल करत संघास २-१ ने आघाडीवर नेले होते. रियल माद्रिद हा सामना जिंकणार असं वाटत असतानाच सेल्टा विगोच्या सैंती मीना याने ८५ व्या मिनिटा़ला गोल करत संघास बरोबरी साधून दिली व अखेर ही लढत बरोबरीत सुटली.
स्पर्धेत गुणतालिकेत रियल माद्रिदचा संघ ५३ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. तर, गतविजेता बार्सिलोनाचा संघ ५२ गुणांसह दुस-या स्थानी आहे. दोन्ही संघात केवळ १ गुणांचा फरक आहे.