नवी दिल्ली – रियल माद्रिद संघाने सोमवारी सेंटियागो येथील बर्नाबियू स्टेडियममध्ये झालेल्या एल क्लासिका सामन्यात बार्सिलोनाचा 2-0 ने पराभव करत विजय नोंदविला.
? FT: @realmadriden 2-0 @FCBarcelona
⚽ @viniciusjr 71′, @marianodiaz7 90’+2′ #Emirates | #RealFootball pic.twitter.com/Vhl1q4oNNM— Real Madrid C.F. ???? (@realmadriden) March 1, 2020
या विजयासह रियल माद्रिद संघाने 56 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर बार्लिलोनाचा संघ 55 गुणांसह दुसऱ्या स्थानी कायम आहे.
? Victory in #ElClasico
? Top of #LaLigaSantanderWHAT A NIGHT for @realmadriden! ? pic.twitter.com/cYeRnEYFT4
— LaLiga English (@LaLigaEN) March 1, 2020
या सामन्यात रियल माद्रिद संघाकडून विनिसियस ज्युनियर याने 71 व्या मिनिटाला पहिला गोल करत संघाल 1-0 ने आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर मारियानो याने (90+2) अतिरिक्त वेळेत गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बार्सिलोना संघाला एकही गोल करता आला नाही.