पुणे – महापालिकेची हद्दवाढ करत 2021 मध्ये शासनाकडून 23 गावांचा समावेश पालिकेत करण्यात आला. त्यानंतर, या गावांच्या ग्रामपंचातीमधील कर्मचारी पालिकेत रुजू करून घेण्यावरून आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी नेमलेल्या समितीने या गावांतील 1124 कर्मचाऱ्यांपैकी 454 कर्मचारी पात्र ठरविले तर उर्वरीत 626 कर्मचाऱ्यांची सेवा नाकारण्यात आली.
सेवा नाकारलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून याबाबतचे आदेश दिल्यानंतर आता पालिकेने अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांची कागदपत्रे मागविली आहेत, त्यांची सुनावणी घेण्यात येत आहे. त्या अंतर्गत 6 गावांमधील कर्मचाऱ्यांची कागदपत्रं तपासण्यात आली असून उर्वरीत कर्मचाऱ्यांची कागदपत्रे 30 ऑक्टोबरपर्यंत तपासली जाणार आहेत.
आकडे बोलतात…
- गावे समाविष्ट झाले तेव्हाचे कर्मचारी – 1124
- पात्र झालेले कर्मचारी – 454
- अपात्र झालेले कर्मचारी – 626
- पहिल्या सुनावणीस
- अनुपस्थित कर्मचारी – 44