RCB’s win WPL 2024, Shreyanka Patil : – स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमियर लीग 2024चे विजेतेपद पटकावले आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा आठ विकेट्सने पराभव करून RCB फ्रँचायझीचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. या सामन्यात बंगळुरुच्या श्रेयांका पाटीलने सर्वादिक4 बळी मिळवले होते.
तिच्या कामगिरीबद्ल बोलताना ती स्वतः म्हणाली, खेळपट्टी थोडी जरी फिरकीला साथ देणारी मिळाली तर माझ्यातील बिस्ट जागा होतो. मला मधल्या षटकांमध्ये गोलंदाजी करायला मजा येते. दिल्लीला चांगली सुरुवात मिळाली होती. पण आम्ही हार मानली नव्हती.
तसेच ती पुढे म्हणाली, दिल्लीने सुरुवात धडाक्यात केली होती. मात्र, आम्हाला माहित होते की एका बळीची गरज होती. जेव्हा आम्हाला पहिला बळी मिळाला त्यानंतर आता अजून एक, असे करत आम्ही शेवटपर्यंत लढलो. आत्तापर्यंत प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे. खेळपट्टीमध्ये काहीतरी नक्की होते. खेळपट्टी फिरकीला पोषक असल्याचे मला दिसताच माझ्यातला वेगळा बिस्ट जागा होतो.
WPL 2024 : चॅम्पियन आरसीबीवर पडला पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…
दरम्यान, साखळी फेरीत मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना श्रेयांका हिच्या डाव्या हाताला अगदी छोटे फ्रॅक्टर झाले होते. पण, त्यानंतरही तिने शानदार पुनरागमन केले. बंगळुरूची ही अष्टपैलू खेळाडू मोसमात सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली. अंतिम फेरीत दिल्लीची एकही फलंदाज तिच्यासमोर तग धरू शकली नाही. फिरकीपटू श्रेयंका पाटीलने सर्वाधिक 13 बळी घेत पर्पल कॅप जिंकली. तिने अंतिम सामन्यात एकूण 4 बळी घेतले.