Live Cricket Score, RCB vs LSG Indian Premier League 2024 : आज, आयपीएल 2024 च्या 15 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे.
दोन्ही संघांना लीगमध्ये आतापर्यंत प्रत्येकी एकच सामना जिंकता आला आहे. बेंगळुरूने तीनपैकी एक सामना जिंकला आहे आणि लखनऊने दोनपैकी एक सामना जिंकला आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघ गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करतील.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध टाॅस जिंकला आहे. कर्णधार फाफ डुप्लेसिसने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स फलंदाजीसाठी प्रथम मैदानात उतरेल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता एम.चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे दोन्ही संघ भिडतील.
🚨 Toss Update 🚨@RCBTweets elect to bowl against @LucknowIPL
Follow the Match ▶️ https://t.co/ZZ42YW8tPz#TATAIPL | #RCBvLSG pic.twitter.com/aquuVQEtm5
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2024
कर्णधार फाफ डुप्लेसिसने प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफच्या जागी वेगवान गोलंदाज रीस टोपलीचा समावेश करण्यात आला आहे. लखनऊचा कर्णधार केएल राहुलनेही प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. मोहसीन खानच्या जागी यश ठाकूरचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
RCB vs LSG Live: दोन्ही संघाची प्लेइंग-11 खालीलप्रमाणे…
Royal Challengers Bangalore : फाफ डुप्लेसिस (कप्तान), विराट कोहली, कैमरन ग्रीन, ग्लेन मैक्सवेल, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, रीस टॉप्ली, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
Impact Players : सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, विजयकुमार विषाक, स्वप्निल सिंह.
Lucknow Supergiants : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिककल, आयुष बडोनी, निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, नवीन उल हक, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मयंक यादव.
Impact Players : एम सिद्धार्थ, शामर जोसेफ, दीपक हुडा, अमित मिश्रा, कृष्णप्पा गौतम.
दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील हेड टू हेड बद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत चार वेळा आमनेसामने आले आहेत. बंगळुरू संघ लखनौवर वर्चस्व गाजवत असल्याचे दिसत आहे. चार सामन्यांमध्ये आरसीबीने 3 तर लखनौने केवळ 1 सामना जिंकला आहे. मात्र, चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या एकमेव सामन्यात लखनौने बेंगळुरूचा पराभव केला होता.