मुंबई – मर्यादीत षटकांच्या सामन्यांची कारकीर्द लांबवण्यासाठी भारतीय संघाचा अष्टपैलु क्रिकेटपटू रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार असल्याची शक्यता बीसीसीआयच्या सुत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने दुसऱ्या कसोटीतून माघार गेतली होती.
जडेजा खरेतर टी-20 व एकदिवसीय सामन्यांचा स्पेशालीस्ट समजला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत त्याने कसोटीतही आपला ठसा उमटवला आहे. मात्र, मर्यादीत षटकांच्या सामन्यांतील कारकीर्द लांबवण्यासाठीच त्याने कसोटीतून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत.
दुखापतीमुळेच त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात निवड करण्यात आलेली नाही. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली असून त्याचे स्वरूप पाहता त्याला शस्त्रक्रीया करावी लागण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.