Ravindra Dhangekar | Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणूक लागल्या असून आता सर्वपक्षाने आपल्या उमेदवारांना रिंगणात उभे केले आहे. त्यातच राज्यातही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे. पुण्यातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाली असून, धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लोकसभेची लढत रंगणार आहे.
भाजपने त्यांच्या दुसऱ्या यादीत पुण्याची उमेदवारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना जाहीर केली होती. मात्र, काँग्रेसने महाराष्ट्रातील एकही जागा जाहीर केली नव्हती. मात्र, दि. २१ रोजी सात जागांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यातील एक नाव पुण्यातील धंगेकर यांचे होते.
धंगेकर हे सध्या कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. गिरीश बापट खासदार झाल्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत नगरसेवक पदावरील धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यात यश मिळवले होते. त्यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव करत आमदारकी मिळविली होती. । Ravindra Dhangekar | Lok Sabha Election 2024
पुणे लोकसभा मतदार संघात तिहेरी लढत होणार आहे. मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिन्ही तगडे नेते मानले जात आहे. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होणार आहे. तिघांच्या प्रचारासाठी महत्वाचे नेते मैदानात उतरणार आहे.
त्यातच आता महाविकास आघाडीकडून प्रचाराचे नियोजन करण्यात आलं असून, धंगेकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे रोड शो होणार आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे, अशी माहिती रवींद्र धंगेकरांनी दिला आहे.
साधारण पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात हे रोड शो आणि सभा जोरदार होणार आहेत. या सभांच्या मार्फत वातावरण निर्मीती केली जाणार असल्याचं रवींद्र धंगेकरांनी सांगितलं आहे. साधारण हे सगळे नेते माझ्या प्रचारासाठी पुण्यात येणार आहे. । Ravindra Dhangekar | Lok Sabha Election 2024