MLA Ashish Jaiswal car accident – रामटेक विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात नागपूर पासून 21 किलोमीटर दूर अंतरावर असलेला कन्हान परिसरात झाला.
या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार जयस्वाल सुखरुप असून त्यांच्या पीएसह दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात झालेल्या गाडीमध्ये ते उपस्थित नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.