मुंबई – कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या समितीनं टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाची आणि मुख्य स्टाफच्या नावाची घोषणा केली आहे. भारताच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली. आता 2021 सालापर्यंत शास्त्री हे भारताच्या प्रशिक्षकपदी कायम राहतील. 2017 मध्ये याआधी रवी शास्त्री यांची निवड झाली होती.
JUST IN – Ravi Shastri has been re-appointed head coach of the Indian men’s side! pic.twitter.com/cpJOn9qtl4
— ICC (@ICC) August 16, 2019
रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने 21 कसोटी सामने खेळले, त्यातील 13 सामन्यात विजय मिळवला. तर, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 36 सामन्यांपैकी 25 सामन्यात विजय मिळवला. एकदिवसीय सामन्यात 60 सामन्यांपैकी 43 सामन्यांत टीम इंडियाने विजय मिळवला, मात्र रवी शास्त्रींच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला विश्वचषक जिंकता आला नाही.
दरम्यान, टीम इंडियाच्या संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्री, रॉबीन सिंग, लालचंद राजपूत, माईक हेसन, टॉम मूडी होते. मुलाखतीच्या पूर्वीच अफगाणिस्तानचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी या शर्यतीतून माघार घेतली होती.