भोजपुरी सिनेमातील मेगा स्टार आणि खासदार रवि किशनची कन्या रिवा किशन लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. “सब कुशल मंगल’ मधून ती आपल्या अभिनय कारकिर्दीचा श्रीगणेशा करणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी 3 जानेवारीला रिलीज होणार आहे, असे समजते आहे. “सब कुशल मंगल’चे पोस्टर अलिकडेच रिलीज झाले आणि त्यातील रिवाचा हॉट अंदाजही प्रेक्षकांसमोर आला.
सिनेमात रिवा किशनबरोबर पद्मिनी कोल्हापुरेचा मुलगा प्रियांक शर्मा पण दिसणार आहे. त्याच्यासाठीही हा सिनेमा पदार्पणाचा सिनेमा असणार आहे. या दोघांबरोबर अक्षय खन्ना या सिनेमात अगदी विशेष रोलमध्ये असणार आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये अक्षय खन्ना एका हातात बंदुक आणि दुसऱ्या हातात गुलाबाचे फुल घेऊन अगदी रिलॅक्स मूडमध्ये दबंग स्टाईलमध्ये बसलेला दिसतो आहे.
या सिनेमाची कथा बिहारमधील पकडवा विवह पद्धतीवर आधारलेली आहे, असे समजते आहे. हा विषय हिंदीपेक्षा भोजपुरी सिनेमातच अधिक शोभून दिसला असत. मात्र, आता हिंदीमध्ये बिहारी स्टाईक इतकी फेमस झाली आहे की या विषयाला बॉलीवूड टच् अगदी आवश्यक झाला आहे.