नवी दिल्ली – राष्ट्रीय लोक दल नेते जयंत सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) औपचारिकपणे सहभागी झाल्याची घोषणा केली.
नड्डा यांनी ‘एक्स’ वर सांगितले की, सिंह यांच्या एनडीएमध्ये सामील होण्याचे मी मनापासून स्वागत करतो आणि देशाच्या विकासाच्या प्रवासात ते महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अलीकडे विरोधी आघाडी ‘इंडिया’चा भाग असलेले जयंत सिंह पक्ष करारानुसार उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या दोन जागांवर निवडणूक लढवू शकतात.
जयंत सिंह चौधरी यांनी एक्सवर लिहिले, मोदींच्या नेतृत्वाखाली भारत विकास आणि गरीबांच्या कल्याणाचा साक्षीदार होत आहे! अमित शहा आणि जेपी नड्डा यांची भेट घेतली आणि एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
विकसित भारताचा संकल्प आणि यावेळी 400 पार करण्याचा नारा पूर्ण करण्यासाठी एनडीए सज्ज आहे. दरम्यान, 2018च्या लोकसभा पोटनिवडणुकीपासून उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि आरएलडीची युती होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी युती करून निवडणूक लढवली होती.