‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट 2021 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटापैकी एक आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवनवे विक्रम करत आहे यावरून या चित्रपटाच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत.
दरम्यान, अभिनेत्री रश्मिकाने ‘पुष्पा द राइज’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी निर्मात्यांकडे मोठी रक्कम मागितल्याची बातमी आहे. ‘पुष्पा द राइज’साठी रश्मिका मंदान्नाला 2 कोटींची ऑफर देण्यात आली होती. आता दुसऱ्या भागासाठी अभिनेत्रीने मानधन म्हणून 3 कोटी रुपये मागितले आहेत. जर चित्रपटाच्या निर्मात्यांनी रश्मिकाची ही मागणी मान्य केली तर अभिनेत्रीच्या चित्रपट कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोच्च मानधन असेल. रश्मिका मंदान्ना हिचे नाव साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
रश्मिकाने अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये ‘डियर कॉम्रेड’, ‘गीथ गोविंदम’ या चित्रपटांचा समावेश आहे. आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री ‘मिशन मजनू’ या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे.