मुंबई – बीड जिल्ह्य़ात एका कार्यकारी अभियंताने स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी केली, किती दुर्दैवी! बीलासाठी राजकीय ठेकेदार यांचा दबाव, सर्व प्रकारचे माफिया कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहे, यांची वैधानिक दखल घ्यावी.
#बीड जिल्ह्य़ात एक कार्यकारी #अभियंता स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी केली,किती दुर्दैवी!बीलासाठी राजकीय ठेकेदार यांचा दबाव,सर्व प्रकारचे माफिया कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहे यांची वैधानिक दखल घ्यावी @Dev_Fadnavis @mipravindarekar @PawarSpeaks @CMOMaharashtra
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 10, 2022
असं ट्विट करत भाजपा नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील राजकारण, गुन्हेगारी व एकूण सद्य परिस्थितीवरून बीड मधील माफिया कारभारावरून निशाणा साधला आहे.
दरम्यान, गेल्या काही काळात बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण तसेच अवैध धंदे मोठ्याप्रमाणावर वाढल्याच्या घटना दिसून येत आहे. अनेक राजकीय मंडळी देखील विविध गुन्ह्यांमध्ये आढळून येत आहे.