दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना बऱ्याच काळापासून “मिशन मजनू’ या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. हा तिच्यासाठी हिंदी सिनेमातील पदार्पणाचा सिनेमा आहे. एवढेच नाही, तर या सिनेमात ती सिद्धार्थ मल्होत्राची हिरोईन असणार आहे, ही तिच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. तिला ‘मिशन मजनू’नंतर लगेचच आणखी एक सिनेमा मिळाला आहे, ही आणखी मोठी आनंदाची बातमी आहे.
View this post on Instagram
अलीकडेच तिने ‘मिशन मजन’चे शुटिंग संपवले आणि ती चेन्नईला दक्षिणेतील ‘सुलतान’च्या शुटिंगसाठी रवाना झाली आहे. याच शुटिंगमध्ये ती सध्या बिझी आहे. तिला ज्युनिअर एनटीआरच्या सिनेमाचीही ऑफर असल्याचे समजते आहे.
View this post on Instagram
त्यानंतर अल्लू अर्जुनबरोबर ‘पुष्पा’मध्येही रश्मिका लीड रोल करणार आहे. तिच्याकडे एकापाठोपाठ एक अनेक सिनेमांची ऑफर आहे. त्यामुळे दक्षिणेबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतही जम बसवण्याचा तिचा प्रयत्न आहे. ‘मिशन मजनू’सारख्या कॉमेडीपटाला किती आणि कसे यश मिळते, यावर तिच्या पुडच्या मार्गक्रमणाची दिशा ठरणार आहे. रश्मिकाला दक्षिणेतून हिंदीमध्ये जम बसवण्यासाठी ‘मिशन मजनू’चे यश पुरेसे होईल.