चंद्रपूर – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नातवाने महाराष्ट्र न्यायालयात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली आहे. सावरकर यांच्यावर लंडनमधील भाषणादरम्यान खोटे आरोप केले आहेत. ही घटना ताजी असतांनाच प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार आहे.
बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून समर्थन देणारे सावरकर हिंदूचे प्रेरणास्थान कसे ? pic.twitter.com/NAjdfowViC
— Shivani Wadettiwar (@SVW790) April 13, 2023
एका कार्यक्रमात बोलतांना शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या,’बलात्कार हे राजकीय शस्त्र असून हे शस्त्र तुम्ही आपल्या राजकीय विरोधात वापरले पाहिजे, असे सावरकरांचे विचार होते.’ यामुळे महिलांना भीती वाटत असते.. या व्हिडीओमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उपस्थित लोकांसमोर त्या आक्रमकरित्या आपले विचार मांडताना दिसून येत आहे.
शिवानी वडेट्टीवार पुढे म्हणाल्या, ‘बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. हे शस्त्र राजकीय विरोधात वापरायला हवे, असे सावरकरांचे विचार होते. या विचारांशी प्रामाणिक असलेल्या लोकांपासून माझ्यासारख्या आणि येथे असलेल्या महिलांनी सुरक्षित कसे समजावे? असा प्रश्न सु्द्धा त्यांनी उपस्थित केला आहे.’ दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर भाजप नेत्यांनाही आक्रमक पवित्रा घेतला आहे.