नवी दिल्ली – नवी दिल्ली स्टेशनवरील एका खोलीत एका महिलेवर दोन रेल्वे कर्मचाऱ्यांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. खोलीबाहेर पहारा देणाऱ्या त्यांच्या दोन साथीदारांसह चार रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
चारही आरोपी इलेक्ट्रिकल विभागात काम करतात, असे रेल्वेने सांगितले. शुक्रवारी प्लॅटफॉर्म 8-9 वर सापडलेल्या महिलेने अधिकाऱ्यांना तिच्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला आणि त्यांनी रेल्वे प्रोटेक्शन फोर्सला माहिती दिली.
महिलेने अधिकाऱ्यांना सांगितले की, ती गेल्या एक वर्षापासून तिच्या पतीपासून विभक्त आहे आणि घटस्फोटासाठी न्यायालयात खटला चालवत आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी ती एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून एका व्यक्तीच्या संपर्कात आली. त्या व्यक्तीने तिला सांगितले की तो एक रेल्वे कर्मचारी आहे आणि तिच्यासाठीही नोकरीची व्यवस्था करू शकतो. हे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला.