मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जहरी टीका काही दिवसांपूर्वी केली होती. हे नागालँडचे राज्यपाल होणार असे मी ऐकले आहे. त्यामुळेच पाटील यांनी माजी मंत्री म्हणू नका असे राऊत म्हणाले होते. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिउत्तर देत थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षच केलं. असे म्हटले होते.
भाजप नेते आणि शिवसेना नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु असतांनाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या खळबळजनक राजकीय वक्तव्याने चर्चेला उधाण आलं आहे.
माध्यमांशी बोलतांना जयंत पाटील म्हणाले,चंद्रकात पाटील आणि रावसाहेब दानवे पाटील हे कदाचित भाजप पक्ष सोडून शिवसेनेत जाण्याची शक्यता असेल. अलिकडेच शिवसेनेत काही गडबड चालू होती, काही नेते शिवसेनेत येत असल्याचं समजतयं. मग, कदाचित रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत पाटील हेच प्रमुख नेते असतील. त्यामुळेच, मुख्यमंत्र्यांचं ते सूचक विधान महत्त्वाचं आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.