नवी दिल्ली : जागतिक बाजारात सोन्याचे दर कोसळल्यानंतर भारतीय बाजारातील सोन्याच्या दरात मोठी घट नोंदली गेली. आज १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४५,३९० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,३९० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६०,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,३९० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,६९० प्रति १० ग्रॅम आहे.
पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४४,५७० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,७२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,३९० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,३९० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६०० रुपये आहे. कालच्या आणि आजच्या दरामध्ये काहीच फरक नाही.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)