मॅंचेस्टरच्या मैदानावर रणवीरचे समालोचन

विश्‍वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान या संघांमध्ये मॅंचेस्टरमध्ये सामना खेळवला जात असताना रणवीर सिंग थेट मॅंचेस्टरच्या मैदानावर पोहोचला होता.

यावेळी मॅंचेस्टरच्या मैदानावर रणवीर सिंगचे समालोचन पाहायला मिळाले. सामना सुरू होण्यापूर्वी रणवीरने तिथले वातावरण कसे आहे हे सांगितताना म्हणाला की, जेवढे लक्ष या लढतीकडे आहे तेवढेच पावसाकडेही आहे. यावेळी त्याने हरभजन सिंग, विरेंद्र सेहवाग यांच्याशी मैदानावरुन थेट संवाद साधल्याचा व्हिडीयो बीसीसीआयने आपल्या ट्विटर हॅंडलरवर टाकला आहे.

25 जून 1983 रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्‍वचषक जिंकला होता. या विजयगाथेवर आधारित “83′ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये कपिल देवची भूमिका रणवीर सिंग साकारणार आहे. तर, त्याच्या पत्नीची भुमिका दिपिका पदुकोण साकारणार आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा कबीर खान सांभाळत आहेत. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.