पकिस्तानात ब्लॉग लेखकाची हत्या

इस्लामाबाद- पाकिस्तनात लष्करी गुप्तहेर संघटना “आयएसआय’वरा टीका करणाऱ्या एका युवा ब्लॉग लेखकाची हत्या करण्यात आली अहे. मुहम्मद बिलाल खान असे हत्या झालेल्या 23 वर्षीय ब्लॉग लेखकाचे नाव आहे. काका एहतेशाम यांच्यासमवेत असताना एक फोन आल्यामुळे मुहम्मद खान घराजवळच्या जंगलामध्ये गेले असताना त्यांच्यावर हल्ला झाला, असे स्थानिक वर्तमानपत्राने म्हटले आहे.

खान यांच्यावर इस्लामाबादेतील जी-9/4 या वनभागामध्ये हल्ला झाला. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिस अधिक्षक सद्दार मलिक नईम यांनी म्हटले आहे. हल्लेखोराने खान यांच्यावर कट्यारीने वार केला होता. काही जणांनी या भागातून बंदुकीच्या गोळीबाराचे आवाजही ऐकले होते, असे नईम यांनी सांगितले.

खान हे सोशल मिडीयावरील सक्रिय कार्यकर्ते आणि मुक्‍त पत्रकारही होते. त्याचे ट्विटरवर 16 हजार, युट्युबवर 48 हजार आणि फेसबुकवर 22 हजार फॉलोअर्स आहेत. खान मूळचे गिलगीट- बाल्टीस्तन येथील होते. इस्लामाबदेतील इंटरनॅशनल इस्लमिक विद्यापिठातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले होते. पाकिस्तानी लष्कर अणि “आयएसआय’ या गुप्तहेर संघटनेवर ते आपल्या ब्लॉगमधून टीका करत असत.

Leave A Reply

Your email address will not be published.