एडीबी कडून पाकला 3.4 अब्ज डॉलर्सचे कर्ज

इस्लामाबाद – एशियन डेव्हलपमेंट बॅंकेकडून (एडीबी) पाकिस्तानला 3.4 अब्ज अमेरिकन डॉलरचे कर्ज मिळणार असल्याची माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सल्लागाराने दिली आहे. पाक सध्या प्रचंड रोखटंचाईला तोंड देत आहे.

त्याच बरोबर देणी वाढतच गेल्यास अर्थव्यवस्था कोसळण्याचे संकट उभे ठाकले आहे. बॅंकेशी करार झाल्यापासून वर्षभरात 2.1अब्ज दिले जातील, अशी माहिती पाकिस्तानचे नियोजन, विकास आणि सुधारणा मंत्री खुशरो बख्तियार यांनी दिल्याचे “डॉन’ दैनिकाने म्हटले आहे.

हे कर्ज “सवलतीच्या व्याज दरात’ असल्याचे बख्तियार यांनी सांगितले. पंतप्रधानांचे अर्थ सल्लागार डॉ. अब्दुल हाफीज शेख ट्विटरवर म्हणाले की, अर्थसंकल्पाला पाठिंबा म्हणून एडीबी पाकिस्तानला 3.4 अब्ज डॉलर्सचे कर्ज देणार आहे. आर्थिक वर्ष 2019-2020 च्या पहिल्या तिमाहीत 2.2 अब्ज डॉलर्स दिले जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.