आपल्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखला जाणारा अभिनेता रणवीर सिंह आणि बॉलिवूडची क्वीन कतरिना कैफ पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्रित दिसणार आहेत. हे दोघे प्रथमच एका चित्रपटात काम करणार असून याची निर्मिती झोया अख्तर करणार आहे. हा चित्रपट गॅंगस्टर ड्रामा असेल. रणवीर सिंहसोबत “दिल धडकने दो’ आणि “गल्ली बॉय’सारखे चित्रपट केल्यानंतर झोया अख्तर आगामी चित्रपट करण्यास उत्साही आहे.
रणवीर सिंहसोबत झोया अख्तरचा हा तिसरा, तर कतरिना कैफसोबत दुसरा चित्रपट आहे. कतरिना आणि झोया खूप चांगले मित्र असून झोयाने यापूर्वीच कतरिनाला या चित्रपटाची कथा सांगितलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रणवीरला चित्रपटाची कथा आवडली आहे, परंतु या चित्रपटाची तयारी सुरू असतानाच लॉकडाउन सुरू झाला. आता लॉकडाउन शिथिल झाला असून लवकरच चित्रपटाच्या शूटिंगची डेट निश्चित करण्यात येतील.
दरम्यान, रणवीर सिंह त्याचा आगामी “83′ चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी खूपच उत्साहित आहे. या चित्रपटात तो भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देवची भूमिका साकारत आहे. या त्याच्यासोबत दीपिका पादुकोणही झळकणार आहे. दुसरीकडे कतरिना कैफ “सूर्यवंशी’ चित्रपटात अक्षयकुमारसोबत झळकणार आहे.