मुंबई – पश्चिम बंगालमधील राणावत रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचा आवाजातील गाणे गाणारी रानू मंडलचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. रानू मंडलच्या व्हिडीओने तिला एका रात्रीत सुपरस्टार बनविले. रानू मंडल यांच्या ‘तेरी मेरी कहानी…’ या गाण्याने सामाजिक माध्यमांमध्ये चांगलीच पसंती मिळविली होती.
Kacha badam ft ranu mondal
😭😂#TejRan pic.twitter.com/ROboNTNXuA— 𝓐𝓱𝓪𝓷𝓪 𝓓 (@ahana_d9) April 13, 2022
मात्र सध्या त्यांच्यावर सामाजिक माध्यमांमधून ट्रोलिंग सुरु आहे. कधी उद्धट बोलण्यावरून तर कधी फॅन्सला दिलेल्या प्रतिसादवरून ट्रोल केले गेले तर आता तिच्या हिमेश रेशमीया बरोबर गायलेले ‘तेरी मेरी’ या गाण्याला विसरल्यामुळे ट्रोल केले जात होते.
तर यातच आता पुन्हा एकदा रानू मंडला सोशल मीडियावर नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती नववधूच्या वेशात दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती व्हायरल बंगाली गाणं ‘कच्चा बदाम’ गाताना दिसत आहे.
नववधूच्या वेशात रानू मंडलनं गायलेल्या ‘कच्चा बदाम’ गाण्याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे. या व्हिडिओवर तिला चांगलेच ट्रोल केले आहे. यापूर्वीही रानू मंडलचा ‘कच्चा बदाम’ गाणं गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
दरम्यान, राणूला तिच्या आवाजाने एक रात्रीत सुपरस्टार बनविले असले तरी आपल्या चाहत्यांना चुकीच्या पद्धतीने ट्रीट केल्यामुळे प्रेक्षक वर्गात त्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात नाराजी झाली. चाहत्यांसोबत गैरवर्तन करणे, मीडियाच्या प्रतिनिधांना उलट उत्तरं देणं, या सर्व चुकांमुळे राणू मंडल पुन्हा तीच परिस्थिती आली. राणू आता तिच्या जुन्या घरीच राहत असल्याची माहिती मिळत आहे. याच घरातून तिने कच्चा बदाम व्हिडिओ शेअर केला मात्र तिला यावरून चांगलंच ट्रोल केले गेले.