Ranka Jewellers – रेअर ज्वेल्स-अ रांका लेगसी (Ranka Jewellers) ह्यांच्या वतीने 20 ते 22 ऑक्टोबर 2023 या तीन दिवसांच्या कालावधीत रांका ज्वेलर्सच्या (Ranka Jewellers) कर्वे रोड शोरूममध्ये ‘रेअर एडिट’ या भव्य एक्झिबिशनचे वस्तुपाल रांका व शीतल रांका यांचे वतीने आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात नाविन्यपूर्ण दागिन्यांची सर्वोत्कृष्ट कारागिरी सर्वांना पाहायला मिळणार आहे. सोने, विविध प्रकारचे हिरे व जडावूचे कलात्मक (Jewelery) अलंकार हे ह्या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य असणार आहे.
तसेच अँटिक व टेम्पल ज्वेलरी, सोन्यामध्ये नक्काशी टेम्पल विथ स्वोरोस्की, कलकत्ती, हेवी चोकर, रोझ गोल्ड ज्वेलरी, दाक्षिणात्य टेम्पल ज्वेलरी, हिऱ्यांमध्ये रोझ कट रत्ने, पाचूचे दागिने याच बरोबर डेली वेअर व इटालियन कलेक्शन, जडाऊमध्ये व्हिक्टोरियन ज्वेलरी अशी विविध आकर्षणे असणार आहेत.
यातील प्रत्येक कलाकुसर ही अलौकिक सौंदर्याचा उत्कृष्ट आविष्कार आहे. दसरा-दिवाळी व लग्नसराईच्या काळात सर्वांना आकर्षक व सौंदर्यपूर्ण दागिने खरेदी करता यावेत ह्या दृष्टीकोनातून ह्या एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे.
अनेक प्रकारच्या कलाकुसरीने सजलेल्या विविध डिझाइन्सचा सुवर्णसंगम असलेल्या मनमोहक दागिन्यांच्या नाविन्यपूर्ण एक्झिबिशनला सर्वांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन शीतल रांका यांनी रेअर ज्वेल्स – अ रांका लेगसी तर्फे केले आहे.