पुणे : गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रणजी करंडक स्पर्धेतील महाराष्ट्र वि. जम्मू-काश्मीर ही लढत सुरू आहे. जम्मू काश्मीरने महाराष्ट्रा समोर विजयासाठी ३६४ धावांचे लक्ष्य ठेवले असून तिस-या दिवसअखेर दुस-या डावात महाराष्ट्राची ५ बाद १९२ अशी अवस्था झाली आहे. महाराष्ट्राला विजयासाठी १७२ धावांची तर जम्मूला ५ विकेटची आवश्यकता आहे.
Stumps Day 3: Maharashtra – 192/5 in 56.4 overs (R A Tripathi 13 off 41, A R Bawane 31 off 57) #MAHvJK @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 19, 2019
जम्मू काश्मीरने पहिल्या डावात २०९ धावा केल्या. यानंतर उमर नाझीरने अचूक मारा करताना ५ गडी बाद करत महाराष्ट्राचा पहिला डाव १०९ धावांत गुंडाळत १०० धावांची आघाडी घेतली.
त्यानंतर जम्मू काश्मीरच्या संघाने तिस-या दिवशी दुस-या डावात सूर्यांश रैनाच्या ८३, अब्दुल समदच्या ७८ आणि फशील रशीदच्या ४३ धावांच्या जोरावर सर्वबाद २६३ धावा करत महाराष्ट्रपुढे ३६४ धावांचे आव्हान ठेवले. महाराष्ट्राकडून दुस-या डावात गोलंदाजीत दिग्विजय देशमुखने ४, बच्छावने ३, संकलेच्याने २ आणि मुकेश चौधरीने १ गडी बाद केला.
End Innings: J & K – 263/10 in 71.3 overs (Abdul Samad 78 off 89, Umar Nazir 0 off 1) #MAHvJK @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 19, 2019
विजयासाठी ३६४ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राची तिस-या दिवसअखेर ५ बाद १९२ अशी अवस्था झाली आहे. विजयासाठी आणखी १७२ धावांची महाराष्ट्राला गरज आहे. रूतुराज गायकवाड ७१, मुर्तझा ट्रंकवाला ५४, अवधूत दांडेकर १, नौशाद शेख १८ आणि राहुल त्रिपाठी १३ धावांवर बाद झाले आहेत. दुस-या डावात जम्मूकडून उमर नाझीर आणि मुदसीर याने प्रत्येकी २ आणि अबिद मुश्ताकने १ गडी बाद केला. तिस-या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा अंकित बावणे नाबाद ३१ धावांवर खेळत होता.