इंदूर – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे सामने उद्यापासून सुरु होत आहेत. या सामन्यांचा थरार उद्यापासून अनुभवता येणार आहे. पहिला उपांत्य सामना मध्य प्रदेश व बंगाल यांच्यात तर दुसरी लढत कर्नाटक व सौराष्ट्र यांच्यात होणार आहे. होळकर मैदानावरील मध्य प्रदेश व बंगाल यांच्यातील लढत रंगणार असली तरीही त्यात बंगालचा संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष राहणार आहे.
#INDvsAUS 2023 | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीबाबतचे काही खास रेकॉर्ड
बंगालने उपांत्यपूर्व सामन्यात झारखंडचा पराभव केला असला तरीही या साखळीतील सामने त्यांच्यासाठी नशिबाने सुकर ठरले. दुसरीकडे मध्य प्रदेशने उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य आंध्र प्रदेशचा पराभव करत उपांत्य फोरीत स्थान मिळवले. त्यामुळे या लढतीतही मध्य प्रदेशचेच पारडे जड राहणार आहे.
बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर दुसरी उपांत्य लढत कर्नाटक व सौराष्ट्र यांच्यात होत असली तरीही कर्नाटकचे पारडे जड राहील. अर्थात उपांत्यपूर्व फेरीत सौराष्ट्रने पिछाडीवरून पंजाबचा दारूण पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती हे कर्नाटकला विसरून चालणार नाही.
या दोन्ही लढतींत जे संघ विजयी ठरतील ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. यंदा स्पर्धेला नवा विजेता मिळणार का असाही प्रश्न आहे. यंदा ही स्पर्धा मुळ स्वरुपात खेळवली जात आहे. जीतके सामने घरच्या मैदानावर झाले तीतकेच सामने बाहेरच्या मैदानांवरही (होम व अवे) झाले. त्यामुळे या चारही संघांना वेगवेगळ्या परिस्थितीत खेळण्याचा अनुभव असल्याने लाभही होणार आहे. अंतिम सामना येत्या 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार असून त्यात कोणते संघ खेळतील हेच पाहणे रंजक ठरेल.