मांडवगण फराटा- रांजणगांव सांडस (ता. शिरूर) येथील राक्षेवाडी, शितोळे वस्ती, पठारे वस्ती परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या भागातील ऊस तोडणी झाल्यामुळे हा परिसर बिबट्याला वावरण्यास मोकळा झाला आहे. त्यामुळे बिबट्या हा नागरिकांना दिवसा शेतात दर्शन घडत असल्याने ते भयभीत झालेले आहे.
कांदा काढणीसाठी महिला मजूर बिबट्याच्या भीतीने मिळत नाही. मजूर मिळाले तरी एकत्र काम करत आहे. बुधवारी सायंकाळी मेंढ पाळ व्यवसायिक बापू कोळपे हे मेंढ्या शेतातून चारून घरी आणत असताना. गट नंबर 680 मध्ये शेतात दबा धरून बसलेल्या दोन बिबट्याने चार मेंढ्यावर हल्ला केला.
यावेळी कोळपे यांनी आरडा ओरडा केल्याने आजूबाजूचे शेतकरी धावत आले आणि बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यात चार मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. यात कोळपे यांचे 30 हजारांच्या वर नुकसान झाले आहे. तसेच पठारेवस्तीवरील बाळासो पठारे यांचा पाळीव कुत्राचा बिबट्याने कुत्रा त्यांच्या समोर मारला. त्यामुळे पठारे वस्ती परिसरात वनविभागाला वारंवार पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी करत आहे. वनविभाग यागोष्टीकडे पूर्ण पणे डोळेझाक करत आहे.