घोडगंगा साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष पदी ॲड. रंगनाथ थोरात

न्हावरे – रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष पदी ॲड. रंगनाथ थोरात यांची आज (दि. ५) बिनविरोध निवड झाली. कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष रणदिवे यांनी इतर संचालकांना उपाध्यक्षपदी संधी मिळावी म्हणून नुकताच उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या कारखान्याच्या उपाध्यक्षपदी ॲड. रंगनाथ थोरात यांची निवड करण्यात आली.

दरम्यान, यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे, कारखान्याचे इतर सर्व अधिकारी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजय देशमुख यांनी काम पाहिले.

ॲड. अशोक पवार यांनी बोलताना सांगितले की, शिरूरचा पूर्व आणि पश्चिम असा कधीही दुजाभाव केलेला नाही. त्यामुळे शिरूरच्या पश्चिम भागाला उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. ॲड.रंगनाथ थोरात यांनी सण-२०१५ ला झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे यांचा दणदणीत पराभव केला होता. त्यामुळे थोरात यांची कारखान्याच्या उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.