नायजेरियाजवळ हाँगकाँगच्या जहाजाचे अपहरण, 18 भारतीयांचा समावेश

हाँगकाँग: नायजेरियाच्या किनाऱ्याजवळ समुद्री डाकूंनी हाँगकाँगच्या जहाजाचे अपहरण केले आहे. त्यात 18 भारतीयही आहेत. सागरी उपक्रमांवर नजर ठेवणाऱ्या जागतिक एजन्सीने ही माहिती दिली आहे.

भारतीय अपहरण झाल्याची बातमी समजताच भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी नायजेरियाशी संपर्क साधला जेणेकरून घटनेविषयी अधिक माहिती मिळू शकेल. तसेच अपहरण केलेल्या भारतीयांनाही सोडले जाऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे.

समुद्रावर जहाजाच्या हालचालींवर नजर ठेवणा एआरएक्स मेरीटाइमने आपल्या संकेतस्थळावर मंगळवारी समुद्री डाकूंनी हे जहाज पकडले आणि जहाजात बसलेल्या 19 लोकांना पळवून नेले अशी बातमी दिली आहे. यापैकी 18 भारतीय असून एक तुर्कीचा नागरिक आहे. ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी नायजेरियन किनारपट्टीवरून जात असताना हाँगकाँगच्या ध्वजांकित ‘व्हीएलसीसी, एनएव्हीई कान्स्टलेशन’ वर समुद्री डाकूंनी हल्ला केला.

Leave A Reply

Your email address will not be published.