आणखी एका प्रकरणात राणा कपूर यांना अटक

मुंबई – येस बॅंकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांना ईडीने अटक केली आहे. राणा कपूर यांना आज ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 30 जानेवारीपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवले आहे.

राणा कपूरला यांना मनी लॉडरिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण एचडीआयएल आणि मॅक स्टार मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये राणा कपूर यांना ईडीने अटक केली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहे. आता त्यांना आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, मनी लॉंडरिंग प्रकरणात येस बॅंकेचे संस्थापक राणा कपूर यांना जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. कपूर, त्यांची पत्नी आणि त्यांच्या तीन मुलींविरुद्ध डीएचएफएलशी संबंधित कंपनीकडून 600 कोटी रुपये घेतल्याबद्दल ईडी चौकशी करत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.