पुणे – मुठा खोरे वारकरी संप्रदाय समितीच्या अध्यक्षपदी रामचंद्र भरेकर यांची, तर उपाध्यक्षपदी रोहिदास उभे शास्त्री यांची निवड झाली आहे. एन.डी.मारणे यांची सचिवपदी फेरनिवड झाली आहे. खारवडे (ता. मुळशी) येथील सर्वसाधारण सभेत ही निवड झाली आहे.
भरेकर महाराज यांना यापूर्वी “मुळशी भूषण’ पुरस्कार मिळाला आहे. ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत व्यवस्थापक म्हणून मागील वर्षी निवृत्त झाले आहेत. 2014 मध्ये या समितीची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी कार्तिक एकादशीला मुळशी तालुक्यातून बहुसंख्य वारकरी लव्हर्डे गाव ते आळंदी अशी पायी वारी करीत असतात.