नवी दिल्ली – भारतीय हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वच एकच होते. प्रत्येक भारतीय हा हिंदूच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. त्यांच्या या विधानावर सर्व स्थरातून प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेत्यांकडून भागवतांचा या विधानांचे समर्थन केले जात आहे. मात्र त्यांचा या विधानावर संभाजी बिग्रेडने उपस्थितीत करत जोरदार घणाघात केला आहे.
ते म्हणाले,’हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते…’ हा RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांना साक्षात्कार आहे की दृष्टांत. मग आरएसएसचा ‘सरसंघचालक’ हा मुसलमानांचा बनवणार का?’ असा सवाल संभाजी बिग्रेडने यांनी केला आहे.
दरम्यान, मुस्लिम समाजातील उच्चविभूषित व्यक्तींना बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाला एकत्र येण्याचे आवाहन भागवतांनी केले होते. त्यांचा या त्यांच्या या भूमिकेवर संभाजी बिग्रेडने सडकून टीका केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी एक पोस्ट लिहून संघाला थेट सवाल विचारला आहे.