वाघोली -जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सकाळी पुणे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात लोकाभिमुख नेता म्हणून दाभाडे यांची कारकीर्द विशेष उल्लेखनीय आहे. सध्या भाजपमध्ये असलेले दाभाडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात का प्रवेश केला आहे, हे मात्र गूढ अजूनही अनाकलनीय आहे.
दाभाडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपची ताकद वाघोली जिल्हा परिषद गटात कमी झाल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
याउलट आमदार अशोक पवार यांची या जिल्हा परिषद गटावर मजबूत पकड निर्माण झाली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, आमदार अशोक पवार, माजी सरपंच शिवदास उबाळे उपस्थित होते.