मुंबई – अभिनेते अरुण गोविल (Arun Govil) हे ‘रामायण’ मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी साकारलेल्या रामाच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. त्यानंतर आता अरुण गोविल एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अरुण गोविल यांना दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
अरुण गोविल आगामी ‘नोटिस’ (Notice) या सिनेमाचं शूटिंग करत होते. या सिनेमाचं शूटिंग शेवटच्या टप्प्यात आलेलं असताना त्यांंना दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतरही अरुण गोविल यांनी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. यामुळे अनेकजण त्यांचे कौतुक करत आहेत. तर काही जण त्यांना दुखापत झाल्याने चिंता व्यक्त करत आहेत.
या सिनेमात नारायण गुप्ता यांच्या भूमिकेत असलेले अरुण गोविल यांना एक अधिकारी ताब्यात घेण्यासाठी येतो. या सीनमध्ये जीप ड्रायव्हरने रिव्हर्स घेताना अरुण गोविल यांच्या कोपराला जोरात लागले. अरुण गोविल यांना दुखापत झाल्यानंतर सेटवरील सर्व मंडळी घाबरलेली होती. पण दुखापतीकडे दुर्लक्ष करत अरुण गोविल यांनी शूटिंग सुरू ठेवले.
दरम्यान, अरुण गोविल ‘नोटिस’ या सिनेमात दीपिका चिखलियासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. ‘रामायण’ या सिनेमात दीपिका चिखलिया सीता मातेच्या भूमिकेत दिसली होती. अभिनेते अरुण गोविल आता प्रताप रघुवंशी यांच्या ‘नोटिस’ या सिनेमात दिसणार आहेत. ‘नोटिस’ या सिनेमाचे दिग्दर्शन प्रदीप गुप्ता करणार आहेत. 2024 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.