Ram Mandir Replica On Ring : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सोमवारी 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण देशातील वातावरण राममय झालं होतं. यावेळी सगळीकडे राम भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. सोशल मीडियावर देखील अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असल्याचं चित्र दिसून आलं. संपूर्ण देश राम भक्तीत तल्लीन झाला होता.
यानिमित्ताने देशभरातील रामभक्तांची अनोखी भक्ती समोर येत आहे. भक्त वेगवेगळ्या प्रकारे प्रभू रामावर प्रेम व्यक्त करत आहेत. असाच एक राम भक्ताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
यूपीच्या मुरादाबादमधून हा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीच्या अंगठीत अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ X वर @@user189876 या आकाउंटवरून शेअर केला गेला आहे.
लोगों की राम मंदिर के प्रति दीवानगी , एक भक्त ने हीरे जड़ित अंगूठी ही बनवा दी.. मंदिर के मॉडल की#RamMandirPranPrathistha #RamMandir pic.twitter.com/WY0FR87fOD
— Viral Baba (@user189876) January 22, 2024
अयोध्येतील राम मंदिराच्या कलाकृतीसह सोन्या आणि हिऱ्यांनी बनवलेली ही अंगठी आहे. राम मंदिराच्या डिझाईनची ही हिऱ्याने जडलेली अंगठी 18 कॅरेट सोन्याची आहे. या अंगठीची किंमत 1,25,000 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.