Pro Kabaddi League 2023-24 ( Patna Pirates vs Bengal Warriors) Patna : प्रो कबड्डी लीग सीझन 10 चा पाटणा लेग 26 जानेवारीपासून सुरू झाला. या लेगच्या पहिल्या सामन्यात पाटणा पायरेट्सचा सामना बंगाल वॉरियर्सशी झाला. या सामन्यात पटनाने बंगालचा 44-28 असा पराभव केला.
आजच्या पहिल्या सामन्यात पटनाने बंगालचा 16 गुणांच्या फरकाने पराभव केला. 2 पराभवानंतर पटनाचा हा पहिला विजय ठरला. बंगाल वॉरियर्सचा हा सलग दुसरा पराभव ठरला.
पटना पाइरेट्स का भौकाल 💪🔥
होम लेग में बंगाल वॉरियर्स को 1️⃣6️⃣ प्वाइंट्स से हराते हुए दर्ज की अपनी सातवीं जीत 💚#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #PATvBEN #PatnaPirates #BengalWarriors pic.twitter.com/0I4OAy0Rah
— ProKabaddi (@ProKabaddi) January 26, 2024
उत्तरार्धात बंगालने शेवटच्या एका मिनिटात पाटणा पायरेट्सला ऑलआउट केले. या विजयानंतर पटना संघ गुणतालिकेत 8व्या वरून 6व्या स्थानावर पोहोचला आहे.
दरम्यान, प्रो कबड्डी लीग 2023-24 च्या हैदराबाद लेगचा अंतिम सामना तेलुगु टायटन्स आणि तमिळ थलायवास यांच्यात खेळला गेला. त्या सामन्यात तमिळ थलायवासने तेलुगू टायटन्सचा 25 गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यानंतर जयपूर पिंक पँथर्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिले.
#PKLSeason10 (#HSvDEL Match 87) : अशु मलिकची दमदार कामगिरी, दिल्लीचा अवघ्या 3 गुणांनी विजय…
पुणेरी पलटण दुसऱ्या, दबंग दिल्ली केसी तिसऱ्या, हरियाणा स्टीलर्स चौथ्या, गुजरात जायंट्स पाचव्या, यू मुंबा सहाव्या, बंगाल वॉरियर्स सातव्या, पाटणा पायरेट्स 8व्या, बेंगळुरू बुल्स 9व्या, तमिळ थलैवास 10व्या, यूपी योद्धा 11व्या आणि तेलुगू टायटन्स 12व्या स्थानावर आहेत.