मुंबई – हिंदी आणि तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘रकुलप्रीत सिंह’ आपल्या ग्लॅमर आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. रकुलने १० जानेवारी २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर रकुलप्रीतने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. दरम्यान, आता हीच लोकप्रिय अभिनेत्री अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री रकुलप्रीत सिंग हिला ईडीने ड्रग्ज प्रकरणी आणि टॉलीवूडशी संबंधित असलेल्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे. यापूर्वी गेल्या वर्षी ३ सप्टेंबर २०२१ रोजी याच प्रकरणात रकुलप्रीतची चौकशी करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा रकुलप्रीतला ईडीने चौकशीसाठी समन बजावण्यात आलं आहे. गेल्या पाच वर्षांपासून या प्रकरणाची चौकशी करत आहे.
दरम्यान, अभिनेत्री रकुलप्रीत सिंग सोबतच अभिनेता रवी तेजा, चार्मी कौर, नवदीप मुमैत खान, तनिश, नंदू, तरुण आणि बाहुबली फेम राणा दग्गुबती या कलाकारांचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या सर्व कलाकारांची ईडी कडून चौकशी होणार आहे.
२०१७ साली कस्टम्सचे संगीतकार केल्विन मस्करेन्हास आणि इतर दोघांकडून ३० लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यानंतर याप्रकरणी ईडीने अनेक्क दाक्षिणात्य कलाकारांच्या चौकशीचा ससेमिरा सुरू केला. त्यामुळे आता पुन्हा एकदा या सर्व कलाकारांना चौकशीसाठी समन बजावण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने यासंबंधी १२ प्रकरणं नोंदवली आहेत आणि ११ आरोपपत्र दाखल केली आहेत. या आरोपपत्रात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ८ जणांची नावं आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा या सर्वच कलाकारांची चौकशी करण्यात येत आहे.
यापूर्वी देखील अभिनेत्रीची करण्यात आली होती चौकशी…
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाशी संबंधित अंमली पदार्थ रॅकेटच्या चौकशी मध्ये एनसीबी अर्थात अंमली पदार्थविरोधी पथकातर्फे रकुलप्रीत सिंग ची मुंबईत चौकशी करण्यात आली होती. यामध्ये रकुल बरोबर अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना सुद्धा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.