मुंबई – रॉनी स्क्रूवालाने त्याच्या आगामी “छत्रीवाली’मध्ये रकुल प्रीत सिंह कंडोम टेस्टरचा रोल करणार असे जेव्हापासून जाहीर केले, तेव्हापासून तिच्या रोलबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. रकुलला आतापर्यंत कधीही असा रोल मिळाला नव्हता.
करनालमधील केमिस्ट्रीची पदवीधर असलेली एक बेरोजगार युवती कंडोमच्या फॅक्टरीमध्ये कंडोमची टेस्टरचा जॉब स्वीकारते. मात्र आपल्या या जॉबबद्दल ती कोणालाही काहीही सांगत नाही. “छत्रीवाली’ हा असाच एकदम वेगळ्या विषयावरचा सिनेमा विसंगतीवर बोट ठेवतो आणि प्रेक्षकांना एक हलकीफुलकी मनोरंजक कथा सादर करतो.
View this post on Instagram
अगदी अलीकडेच लखनौमध्ये सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली. रॉनी स्क्रूवालाच्या बॅनरच्यावतीने सिनेमाचे एक पोस्टर रिलीज केले गेले आहे. त्यामध्ये रकुल प्रीत सिंह कंडोमचे एक मोठ्या आकाराचे पाकीट क्लॅपबोर्डप्रमाणे कॅमेऱ्यासमोर धरताना दिसते आहे.
“छत्रीवाली’तील कंडोम टेस्टिंग करणाऱ्या एक्स्पर्टच्या रोलव्यतिरिक्त रकुल प्रीत सिंहकडे इतर काही महत्त्वाचे प्रोजेक्ट आहेत. “इंडियन 2′ आणि “ऐलान’ हे दोन तमिळ प्रोजेक्ट तिच्याकडे आहेत.