मुंबई – राखी सावंत आपल्या अतरंगी स्टायलमुळे कायम चर्चेत असते. प्रसिद्धीसाठी राखी कधी काय करेल याचा नेम नाही. राखी कधी खतरनाक ड्रेस घालून येते तर कधी वादग्रस्त वक्तव्य करते. मात्र यावेळेस राखीने जे केले आहे ते पाहून चाहत्यांनी अक्षरशः कपाळावर हात मारून घेतले आहेत. यावेळी राखी थेट रस्त्यावर मेंढ्या वळताना दिसून आली आहे.
नुकताच राखी सावंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये राखी स्वतः सांगत आहे की ती सध्या म्हैसूरमध्ये आहे. काळा गॉगल घालून, केस मोकळे सोडून आकर्षक शॉर्ट ड्रेस परिधान करून राखी म्हैसूरच्या रस्त्यावर मेंढ्यांच्या कळपामध्ये दिसून आली. यावेळी राखीने थेट रस्त्यावरील मेंढ्या बाजूला करण्याचे काम केल्याचे पाहायला मिळत आहे. हातात काठी घेऊन मेंढ्या हाकणाऱ्या राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
View this post on Instagram
राखी सावंतच्या या मजेशीर व्हिडिओला चाहते प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत. एकाने लिहिले ‘ती तिच्या आयुष्याचा आनंद घेत आहे’ तर दुसऱ्याने लिहिले ‘हा मी आतापर्यंत पाहिलेला राखीचा सर्वात मजेदार व्हिडिओ आहे’. विशेष म्हणजे एका मेंढीला दीदी… दीदी म्हणून हाक मारणाऱ्या राखीवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.