पुणे – दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य राज्य पदाधिकारी व निमंत्रितांच्या उपस्थितांच्या बैठकीत सर्वानुमते राजू घाटोळे यांची मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
घाटोळे यांनी रस्ता सुरक्षा विषयक जागतिक बँकेच्या परिसंवादात” What works and what Does not in Road safety भारताकडून प्रतिनिधित्व केले आहे.
SKOCH ROUND TABLE MEETING या सेमिनारमध्ये राज्य परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या समवेत राजू घाटोळे यांचा सहभाग होता. राजू घाटोळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संपूर्ण राज्यातील सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी निवडीचे स्वागत केले आहे.