पुणे – पुणे ऑटो एक्सपो यांच्यावतीने रस्ता सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे शहर मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे राज्य अध्यक्ष राजू घाटोळे यांना पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राजू घाटोळे हे गेले 40 वर्ष सरकार मान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल क्षेत्रामध्ये रस्ता सुरक्षा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, तसेच गाव तिथे ग्रंथालय या चळवळीत पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे ते कोषाध्यक्ष आहेत.
राजू घाटोळे यांनी सरकार मान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूलसाठी इंधन वाचवा परिसंवाद आयोजित केले. तसेच सी.आय. आर. टी. पुणे या केंद्रीय वाहतूक संस्था यांचे मार्फत गुणवत्ता दर्जा व कुशल वाहन चालक निर्माण करण्यासाठी पंधराशे ड्रायव्हिंग स्कूल संचालक व महिला संचालकांना प्रशिक्षण दिले. तसेच पुणे शहरात विविध शाळांमध्ये ५००० मोफत हेल्मेट चे वाटप हिरोमोटो क्रॉप कंपनी यांच्या सीएसआर फंडातून केले आहे.