दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आगामी “दरबार’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. रजनीकांत यांचा खास अंदाज या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. या चित्रपटामध्ये बॉलीवूडचा अण्णा अर्थात अभिनेता सुनील शेट्टी देखील भूमिका साकारत आहे. ट्रेलरमधील रजनीकांत यांच्या तोंडी असलेले डायलॉगदेखील प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी पुरेसे आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगादोस केले असून हा चित्रपट पुढील वर्षी पोंगलच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. यामध्ये अभिनेत्री नयनाताराची मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट हिंदीसह तामिळ आणि तेलुगु भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार आहे.
रजनीकांत या चित्रपटात 25 वर्षानंतर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. यापूर्वी त्याने 1992 मध्ये “पांडियन’ या तामिळ चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर अनेक भूमिका केल्यानंतर तब्बल 25 वर्षांनी पुन्हा एकदा पोलिसांच्या वर्दीत रजनीकांत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे.